कोकण रेल्वे मार्गावरील पुणे-सावंतवाडी साप्ताहिक स्पेशलच्या चार फेर्या धावणार.
दीपावली सुट्टीच्या हंगामामुळे कोकण मार्गावर धावणार्या नियमित गाड्यांना प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या पुणे-सावंतवाडी साप्ताहिक स्पेशलच्या ५ व १२ नोव्हेंबर रोजी, तर परतीच्या प्रवासात ६ व १३ नोव्हेंबर रोजी फेर्या धावणार आहेत.पुणे-सावंतवाडी साप्ताहिक स्पेशल मंगळवारी सकाळी ९.१५ वा. पुण्यातून सुटून त्या दिवशी रात्री १०.३० वा. सावंतवाडी येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात सावंतवाडी येथून रात्री ११.२५ ला सुटून दुसर्या दिवशी सकाळी १२.१५ वा पुणे येथे पोहचेल. २० एलएचबी डब्यांच्या स्पेशलला लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, सिंधुदुर्ग, कुडाळ स्थानकात थांबे आहेत.www.konkantoday.com