
मी अजून किती दाढी पिकवायची? माझ्या मागून आलेले अनेक जण मंत्री झाले-निलेश राणे.
मी अजून किती दाढी पिकवायची? माझ्या मागून आलेले अनेक जण मंत्री झाले. ज्योतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट, अमित देशमुख, विश्वजीत कदम हे सर्व माझ्यानंतर आमदार-खासदार होऊन मंत्री झाले.मात्र मला कुडाळ मालवण विधानसभेच्या लोकांची सेवा करण्याची संधी मिळावी असं शिवसेना शिंदे गटाचे कुडाळचे उमेदवार निलेश राणे यांनी म्हटलं. जिथे माझ्या साहेबांचा पराभव झाला तिथेच मला निवडून यायचं आहे, म्हणून कुडाळ मालवण विधानसभा निवडणूक लढतोय असंही ते म्हणाले. कुडाळ-मालवणमधील सभेत बोलताना निलेश राणेंनी हे वक्तव्य केलंय.लोकसभेत नारायण राणे निवडून यावेत असं नियतीला मान्य होतं म्हणून ते लोकसभेत निवडून आले आणि आता विधानसभेला निलेश राणे निवडून आला पाहिजे असंही नियतीला मान्य असल्याचं दिसतंय असं निलेश राणे म्हणाले.