
*महासंस्कृती महोत्सव 11 ते 15 फेब्रुवारी**यशस्वी महोत्सवासाठी जबाबदारी पार पाडावी- जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह*
*रत्नागिरी, दि. 6 : येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात 11 ते 15 फेब्रुवारी होणाऱ्या महासंस्कृती महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संबंधित विभागांनी आपली-आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडावी, अशी सुचना जिल्हाधिकारी एम देंवेंदर सिंह यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात महासंस्कृती महोत्सव आढावा बैठक आज झाली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी प्रांताधिकारी जीवन देसाई, पोलीस उपधीक्षक निलेश माईणकर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, मुख्यधिकारी तुषार बाबर, अभिजित गोडबोले आदी उपस्थित होते. तहसिलदार हणमंत म्हेत्रे यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. 11 फेब्रुवारीला मराठी बाणा, 12 रोजी महानाट्य शिवबा,13 ला महाराष्ट्राची संस्कृती-नंदेश उमप, 14 ला महाराष्ट्राची लोकधारा संगीत रजनी आणि 15 रोजी संगीत रजनी –अवधूत गुप्ते असे कार्यक्रम होणार आहेत. सांयकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत हे कार्यक्रम होणार आहेत. सुरुवातीला नमन, जाखडी, भजन, संगमेश्वरी बोली आणि कोकणातील लोककला असे अनुक्रमे स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम होणार आहेत. जिल्हाधिकारी श्री सिंह म्हणाले, पोलीस विभागाने कार्यक्रम स्थळ पाहणी करुन वाहतूक व्यवस्था, वाहनतळ व्यवस्थेचे नियोजन करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने मंडप व्यवस्था, बैठक व्यवस्था करावी. शिक्षण विभागाने चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा घ्यावी. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने बचत गटाचे स्टॉल, पर्यटन विभागानेही स्टॉल उभारावा.नगरपालिकेने फिरत्या स्वच्छता गृहांची व्यवस्था, स्वच्छता यांची सुविधा उपलब्ध करावी. हा महोत्सव मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी आपा-पली जबाबदारी उत्तमरित्या पूर्ण करावी, असेही ते म्हणाले.www.konkantoday.com