भाजपने एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, महेश गायकवाड यांची प्रतिक्रिया.

कल्याण : बंडखोर शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. गायकवाड यांनी सांगितले की, महाराष्ट्रात भाजप एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच हकालपट्टी केल्याबद्दल जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या धन्यवाद मला याबद्दल काही बोलायचं नाही आहे असे ही महेश गायकवाड यानी सांगितले. ज्याने कल्याण पूर्व भकास केलं पोलीस स्टेशन रक्तरंजित केलं कल्याण पूर्वेत शिवसेना संपवण्याचा डाव टाकला, त्यांनाच भाजपने उमेदवारी दिली, जनतेच्या वतीने निवडणूक लढवतोय जनतेने मला चेहरा केलाय असेही गायकवाड यानी संगीतिले. तसेच कल्याण पूर्वेत भाजपचे उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या विरोधात बंडखोरी करून अर्ज दाखल केलेल्या शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी आज पासून गल्लोगल्ली डोर टू डोर प्रचार सुरू केल्या आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button