फटाक्यांच्या धूरामुळे प्रदूषण, चिपळूण शहर गुदमरले.
एकीकडे शासनाच्या स्वच्छ सर्व्हेक्षण २०२४-२५ व माझी वसुंधरा अभियानांतर्गत नगर परिषदेने प्रदूषणमुक्त दिवाळी साजरा करण्यासाठी यावर्षी मोठी जनजागृती केली. असे असताना शुक्रवारी लक्ष्मीपूजनाला व्यापार्यांनी आनंदाच्या भरात लाखो रुपयांचे फटाके वाजवत चांगलाच धूर काढला. तर काही नागरिकही मोठ्या प्रमाणात फटाके फोडत आहेत. यामुळे होणार्या प्रदूषणात शहर गुदमरले आहे. तर शनिवारी याच फटाक्यांमुळे शहरात झालेला कचरा नगर परिषदेच्या ६ सफाई कामगारांनी दिवसभर गोळा केला.नगर परिषदेने यावर्षी स्वच्छ सर्व्हेक्षण व माझी वसुंधरा अभियानात अव्वल कामगिरी केली आहेत. या कामगिरीत सातत्य रहावे म्हणून प्रशासन सर्व स्तरावर मोठे प्रयत्न करीत आहेत. यातूनच सिंगल युज प्लास्टिक व थर्माकोल अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था, नागरिक, स्थानिक संस्था यांच्या सहकार्याने शहरात हजारो झाडांची लागवड केली जात आहे. यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव तसेच नवरात्रौत्सव साजरा करण्यासाठी नगर परिषदेने प्रयत्न केले त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. www.konkantoday.com