दापोली तालुक्यातील कोंगळे सुकोंडी येथील प्रौढाचा मुंबईत मृत्यू.
दापोली तालुक्यातील कोंगळे सुकोंडी येथील संजय बबन साळवी या ४३ वर्षीय प्रौढाचा मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय साळवी हे आपल्या शेतामध्ये काम करण्यासाठी गेलेले होते.बांधावरून तोल जावून ते खाली पडले. त्यावेळेस त्यांच्या मानेला व उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून रत्नागिरी येथे सरकारी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तेथून अधिक उपचाराकरिता केईएम हॉस्पिटल मुंबई येथे दाखल करण्यात आले. २९ रोजी सकाळी ८.५३ वाजता त्यांचा मृत्यू झाला.www.konkantoday.com