
जनाब उद्धव ठाकरेंनी आम्हाला छत्रपतींच्या प्रेमाबद्धल शिकवू नये-आमदार नितेश राणे.
आगामी विधानसभा निवडनुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरेंच्या प्रचार सभांचा धडाका होणार असल्याचे चित्र आहे. ठाकरेंच्या पुढील 13 दिवसात राज्यात 34 सभा होणार आहेत. मुंबई -ठाणे ते कोकण, मराठवाडा ते विदर्भ, उत्तर महाराष्ट्र ते पश्चिम महाराष्ट्रभर सभांचा धुरळा होणार असून 13 नोव्हेंबरला कणकवली, कुडाळ सावंतवाडी येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. दरम्यान, याच सभेवरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत लक्ष्य केले आहे.उद्धव ठाकरे यांनी कणकवलीत सभा घ्यावी, ते सभा घेणार असतील तर मी उद्धव ठाकरेंचे स्वागत करतो, शिवाय त्यांना मी सभेसाठी पैसे पाठवतो, असे आव्हान नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना दिले आहे. कोकणात राणे आणि सामंत यांच्या जीवावर उद्धव ठाकरे ढेकर काढायचे. यांना गाड्या आम्ही विकत घेऊन द्यायचो, तेव्हा त्यांना हे चालायचं? असा सवालही नितेश राणे यांनी केलाय. संजय राऊत यांची छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याची लायकी नाही. ते संजय राऊत फडणवीस साहेबांवर आरोप करत आहेत. सामनामध्ये कार्टूनच्या माध्यनातून महिलांचा अपमान करण्याचं काम सुरु आहे. मुघलांची पिलावळ महाराजांच्या स्मारकाबद्दल आम्हाला शिकवणार का? ज्याच्यामुळे अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचे स्मारक होऊ शकले नाही, तो असीम सरोदे कोणाचा जावई आहे? अरबी समुद्रात होणाऱ्या महाराजांच्या स्मारक बाबतची याचिका मागे घे असं असीम ला सांगा. उद्धव ठाकरे 50 लाख रुपये आमच्या मालवण मधील छत्रपतींच्या मंदिरात देणार होता, त्याचा विसर त्यांना पडला आहे का? कोल्हापूरमध्ये राजेंचा अपमान झाला, तेव्हा बंटी पाटीलला का रोखलं नाही? विशाल गडच्या वेळी हे कुठे होते? त्यामुळे जनाब उद्धव ठाकरेंनी आम्हाला छत्रपतींच्या प्रेमाबद्धल शिकवू नये, अशी घणाघाती टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली