खेड तालुक्यातील खेड-कुळवंडीत शिकारीसाठी गेलेला शिकारी गंभीर जखमी.
खेड तालुक्यातील कुळवंडी येथील जंगलमय भागात शिकारीसाठी गेलेला चंद्रकांत रामचंद्र मोरे (३३, रा. कुळवंडी तांबरीचीवाडी) हा शिकारी गंभीररित्या जखमी झाल्याची घटना शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास घडली. पोलिसांनी त्याच्याकडून ५० हजार रुपये किंमतीच्या काडतुसांसह बंदूक हस्तगत केली. विनापरवाना बंदूक वापरून स्वतःच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत मोरे याच्याकडे बंदूक चालवण्याचा कोणताही परवाना नसतानाही बंदूक घेवून तो शिकारीसाठी गेला होता. हातातील लोड केलेली बंदूक त्याने निष्काळजीपणे हाताळत असताना बंदुकीचा स्फोट होवून तो गंभीररित्या जखमी झाला. ही बाब पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथक तातडीने घटनास्थळी तत्काळ पोहोचले. शिकारीसाठी वापरलेली ५० हजार रुपये किंमतीची १२ बोअर सिंगल बॅरल काडतुसाची बंदूक व चादर पोलिसांनी जप्त केली. सायंकाळी उशिरा शिकार्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. www.konkantoday.com