१०२ क्रमांकाच्या रूग्णवाहिका चालकांची दिवाळी अंधारात
जिल्हापरिषद आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १०२ क्रमांकाच्या रूग्णवाहिका चालकांची दिवाळी अंधारात गेली आहे. ठेकेदाराने ऑक्टोबरचे मानधन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याचा विसर पडल्याने चालकांना ऐन दिवाळी सणात आर्थिक समस्येला सामोरे जावे लागले आहे.जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील १०२ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेचे चालक गेली ११ वर्षे अल्प मानधनावर काम करत आहेत. त्यांना वेळेवर मानधनही मिळत नाही. थकीत व नियमित मानधनासाठी या रूग्णवाहिका चालकांना सातत्याने अवलंबून रहावे लागत आहे. www.konkantoday.com