
शिवसेनेचे नाराज नेते उदय बने यांची दखल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार की नाही?
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आजपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून सुरुवात होणार असून कोल्हापूरला अंबाबाई देवीच्या दर्शनानंतर प्रचाराचा नारळ फुटणार आहे स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोल्हापुरात दाखल होत असून त्यानंतर सायंकाळी सहा वाजता रत्नागिरी येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार बाळ माने यांच्या प्रचारासाठी असलेल्या जाहीर सभेला ते संबोधित करणार आहेत या सभेची जोरदार तयारी सुरू असून या सभेसाठी मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक येणार आहेत मुलाखती घेऊनही ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने नाराज असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उदय बने यांनी काल आपला अपक्ष भरलेला अर्ज मागे घेतला आहे त्यामुळे पक्षात बंडखोरी न होता पक्षाचे अधिकृत उमेदवार बाळ माने यांना दिलासा मिळाला आहे उदय बने यांना उमेदवारी मिळाली नसली तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना योग्य तो न्याय देतील असा विश्वास आमदार राजन साळवी यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केला होता आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज रत्नागिरीत येत असून ते नाराज असलेल्या उदय बने यांची दखल घेणार की नाही हे आज स्पष्ट होणार आहे मात्र काल पत्रकारांशी बोलताना नाराज असलेल्या उदय बने यांनी आपण राजकारण थांबवणार असल्याचे सांगितले होते त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे या सभेत उद्धव ठाकरे कोणाचा समाचार घेणार हे ही आज सायंकाळी स्पष्ट होईल