मानसकोंड येथील विंचू दंश झालेल्या 26 वर्षीय विवाहितेचा भाऊबीजेच्या दिवशीच मृत्यू.

संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड येथील विंचू दंश झालेल्या 26 वर्षीय विवाहितेचा भाऊबीजेच्या दिवशीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.मंजिरी वैभव फेपडे असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. तिच्या मृत्यूमुळे मानसकोंड गावावर शोककळा पसरली आहे. तिला दीड वर्षाची मुलगी आहे.विंचू दंश झाल्यानंतर मंजिरीला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिला अचानक श्वसनाचा त्रास जाणवू लागला. डॉक्टरानी तिला कोल्हापूर येथे हलवण्यास सांगितलं. कोल्हापूर येथे उपचारासाठी नेतानाच तिचा मृत्यू झाला. तिच्या या मृत्यूची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली. मंजिरी हिचे मानसकोंड येथेच माहेर आणि सासर आहे. तिला दीड वर्षाची मुलगी असल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button