ज्ञानदीप भडगावच्या आर्ना पाटणे व सफवान चौगुले यांची महाराष्ट्र राज्याच्या नेटबॉल संघामध्ये निवड.

खेड – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व कोल्हापूर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 8 ऑक्टोबर 2024 रोजी आदर्श विद्या विद्यालय मिनचे येथे झालेल्या 17 वर्षे वयोगटातील विभागस्तरीय नेटबॉल स्पर्धेमध्ये ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) या शैक्षणिक संस्थेच्या कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (माध्यमिक विभाग) या प्रशालेतील इ. 10 वी तील आर्ना रूपम पाटणे व कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (उच्च माध्यमिक विभाग) या प्रशालेतील 11 वी तील सफवान म. हनिफ चौगुले यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यांची दि. 7 व 8 नोव्हेंबर 2024 रोजी भंडारा येथे होणाऱ्या राज्याच्या नेटबॉल संघामध्ये निवड झाली आहे. दोघांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे. आर्ना व सफवानला क्रीडा शिक्षक व पर्यवेक्षक संतोष भोसले यांनी मार्गदर्शन केले. आर्ना व सफवानच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे विश्वस्त पेराज जोयसर, दीपक लढढा, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य भालचंद्र कांबळे, चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे व सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button