सावंतवाडीत महायुती – महाविकास आघाडीत बंडखोरी – चौरंगी लढत.

कुडाळ – कणकवलीत दोन सेनेत सरळ सामना..!सिंधुदुर्ग/प्रतिनिधी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अर्चना घारे -परब आणि भाजपाचे विशाल परब या दोघांनी आपले उमेदवारी अर्ज मागे न घेता बंडखोरी केली असून या मतदारसंघात आता चौरंगी सामना रंगणार आहे. अर्चना घारे – परब या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कोकण विभागाच्या महिला अध्यक्षा असून भाजपाचे विशाल परब हे भाजपाच्या राज्य युवा – मोर्चाचे उपाध्यक्ष आहेत.या दोघांनी आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपले अर्ज मागे न घेतल्याने महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षण मंत्री, शिंदे सेनेचे दीपक केसरकर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार राजन तेली या दोघानाही बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. या चौघांव्यतिरिक्त दत्ताराम गावकर आणि सुनील पेडणेकर हे दोघे अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान ‘वरिष्ठांकडून दबाव येऊन सुद्धा, मी माझं मन विचलित होऊ न देता, जनतेला दिलेल्या शब्दाचा मान राखून निवडणुकीच्या रिंगणात उतरले ‘असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बंडखोर नेत्या अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांनी व्यक्त केला आहे. उद्या पासून आपण प्रचाराला सुरुवात करणार असून, जनतेचा मला नक्कीच चांगला पाठिंबा मिळेल असा विश्वास देखील त्यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. मी कोणावरही नाराज नसून, वरिष्ठांनी मला खूप प्रेम दिलं असल्याचे त्या म्हणाल्या. आपल्याला पाकीट हे निवडणूक चिन्ह मिळाले असून, त्या समोरील बटन दाबून आपल्याला विजयी करा असे आवाहन देखील त्यांनी केले. यावेळी पक्षाचे तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर, हिदायतुल्ला खान, याकुब शेख, संजय भाईप, विनायक परब, संतोष जोईल, नवल साठेलकर, ऋत्विक परब, विवेक गवस, अवधूत मराठे, साबाजी रेडकर, निलेश गावडे, नोबर्ट माडतीस, पंढरी राऊळ आदी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीचे अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी,कुडाळ आणि कणकवली या तीन विधानसभा मतदारसंघात एकूण १७ उमेदवार आता रिंगणात आहेत.आज चौघांनी आपले अर्ज मागे घेतले. नाईक – निलेश राणे आमने – सामने कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघात आज ऊबाठा सेनेचे महा विकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा वैभव नाईक आणि प्रशांत नामदेव सावंत या अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.’बसपा ‘चे रवींद्र कसालकर आणि महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अनंत पाटकर व एक अपक्ष असे पाच उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत वैभव नाईक आणि महायुतीचे शिंदे सेनेचे उमेदवार डॉ.निलेश राणे यांच्यातच खरी लढत होणार आहे. कणकवलीत दोन सेनेत सरळ सामना कणकवली विधानसभा मतदार संघात आज प्रकाश दत्ताराम नारकर,विश्वनाथ बाबू कदम या दोघा अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. मात्र या मतदार संघात महायुतीचे भाजपाचे उमेदवार नितेश राणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्यात सरळ सामना होणार आहे. चंद्रकांत आबाजी जाधव (बसपा),गणेश अरविंद माने, बंदेनवाझ हुसेन खानी,संदेश सुदाम पारकर हे अपक्षही रिंगणात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button