
विनायकजी राऊत यांनी आपल्या चिपळूण दौऱ्यात NDRF टीमशी थेट संवाद साधला
*चिपळूण तालुक्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) ची टीम येथे दाखल झाली असून, त्यांना स्थानिक भौगोलिक परिस्थितीची सखोल माहिती व योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक होते. यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व सचिव मा. विनायकजी राऊत यांनी आपल्या चिपळूण दौऱ्यात NDRF टीमशी थेट संवाद साधला.
राऊत यांनी आपत्कालीन व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेतला आणि आवश्यक सूचना दिल्या. त्यांनी स्थानिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धोरणात्मक आणि तत्काळ कृतीचा सल्ला देत, कार्यक्षमतेने काम कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. या भेटीत त्यांनी NDRF सदस्यांच्या निवास, भोजन आणि अन्य गरजांविषयी आपुलकीने चौकशी केली. “कोणतीही अडचण उद्भवल्यास ती सोडवण्यासाठी आपण नेहमी उपलब्ध आहोत,” असा विश्वासही त्यांनी दिला.
या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम व इतर स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनीही NDRF ला आवश्यक माहिती देत स्थानिक सहकार्याची ग्वाही दिली.