प्रभावी लॉजिस्टिक सेवा एसएमईंच्या विकासासाठी महत्वपूर्ण

मुंबई, ४ नोव्हेंबर २०२४: जे. ए. लाइफस्टाइल अंतर्गत अक्षय आणि झरना यांनी २०१९ मध्ये पिंटरेस्ट आणि एट्सीच्या ट्रेंडपासून प्रेरित होऊन पश्चिमेकडील बाजारपेठेतील वाढत्या ग्राहकवर्गापर्यंत कस्टम-मेड पोशाख पोहोचवण्याच्या उद्देशाने ब्लश ब्राइड्सची सुरुवात केली.
कोव्हीड-१९ नंतर व्यवसायात सुधारणा होत असताना कंपनीला विकासाच्या वाटेवर घेऊन जायचे असेल तर तिला जागतिक स्तरावर घेऊन जाणे आवश्यक असल्याचे जोडप्याने हेरले. ई-कॉमर्सच्या वाढीमुळे संधी तर होत्याच पण त्यात विविध अडथळेही होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्री करणे म्हणजे डिलिव्हरीचे ठिकाण कोणतेही असले तरी जटिल निर्यात प्रक्रियेतून जात उत्पादन वेळेवर पोहोचण्याची हमी असणे आवश्यक होते. कंपनीची ही गरज ओळखून ते मदतीसाठी फेडएक्सकडे वळले.

फेडएक्सच्या डिजिटल टूल्स आणि इंटरनॅशनल शिपिंग सोल्यूशन्ससह अक्षय आणि त्यांची टीम प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यात सक्षम झाली. ते आता रीअलटाइममध्ये शिपमेंटचा मागोवा घेऊ शकत होते, शुल्क आणि करांची गणना करू होते तसेच निर्यात मंजुरी सुलभ प्रक्रिया देखील सुलभ झाली होती. या सर्वांमुळे त्यांना जगभरातील ग्राहकांना दिलेली वचने पूर्ण करण्यात मदत झाली.

फेडएक्सच्या साथीने समोर आलेल्या लॉजिस्टिक अडथळ्यांवर मात करून जे.ए. लाइफस्टाइलने विकासाची नवीन उंची गाठली आहे. त्यांनी केवळ जागतिक बाजारपेठेत प्रवेशच केला नाही तर ते त्यात यशस्वीही झाले.  

त्यांनी निर्मिती केलेले पर्सनलाइज्ड नववधूचे कपडे लवकरच बेस्टसेलर बनले आणि काही वर्षांत कंपनीचा विस्तार यूएस, यूके, युरोप, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये झाला. आज त्यांचा व्यवसाय वार्षिक ६००,००० यूएस डॉलरपेक्षा जास्त कमाई करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button