अमित ठाकरेंसाठी माघार न घेतल्याने सरवणकर व शिंदे सेनेविरोधात मनसैनिकांचा राग.

अमित ठाकरेंसाठी माघार न घेतल्याने सरवणकर व शिंदे सेनेविरोधात मनसैनिकांचा राग असणार आहे. हा राग फक्त माहीमच नाही तर मुंबईतील शिंदे गटाविरोधात असलेल्या १२ मतदारसंघांमध्ये निघण्याची शक्यता आहे. मनसेने एकनाथ शिंदेची शिवसेना जिथे जिथे उमेदवार लढवतेय त्यापैकी १२ ठिकाणी उमेदवार दिले आहेत. शिंदे सेना मुंबईत १६ जागा लढवत आहे. यापैकी १२ जागांवर आता मनसैनिकांचा रोष पत्करावा लागणार आहे. उर्वरित ४ जागांवरही मनसे शिंदे सेनेला मदत करण्याची शक्यता खूपच कमी झाली आहे. माहीम विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसापासून सस्पेन्स होता. आमदार सदा सरवणकर उमेदवारी मागे घेतील अशी चर्चा होती.दरम्यान, आज सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. यामुळे आता माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर आणि काही कार्यकर्ते मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी निवासस्थानी गेले होते, यावेळी ठाकरे यांनी सरवणकर यांना भेट दिली नाही. दरम्यान, या भेटीवर बोलताना सदा सरवणकर म्हणाले, आम्ही राज ठाकरे यांना भेटीसाठी वेळ मागितली होती. त्यांनी वेळ दिली नाही. तुम्ही निवडणूक लढणार असाल तर लढा, असं राज ठाकरेंनी सांगितल्याचे सरवणकर म्हणाले. यामुळे आता मी निवडणूक लढणार आहे, असंही सदा सरवणकर म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button