अखेर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उदय बने यांनी आपला उमेदवारी अर्ज घेतला मागे, रत्नागिरी मतदार संघात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत होणार.
रत्नागिरी मतदार संघातूनमाजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बने याने बंडखोरी करून अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र त्यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला अपक्ष म्हणून दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला मात्र बने यांची नाराजी संपलेली नाही आपण निषेध म्हणून हा अर्ज भरला होता पण आपण आता तो मागे घेत आहोत यापुढे आपल्याला शिवसेना हा विषय संपलेला आहे आपण प्रचारात कोणताही सहभाग घेणार नाही आपण लोकांची सेवा करत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले बने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात आता पालकमंत्री उदय सामंत व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे बाळ माने यांच्यात सरळ लढत होणार आहे