
जिंदाल मिरवणेच्या जेटी आणि मच्छिमार समस्या बाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे आदेश
रत्नागिरी, lदि.१७:- राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज स्थानिक मच्छीमारांचा समस्या सोडविण्याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीची बैठक पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांच्या पाली कार्यालयात पार पडली.
रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे असलेल्या जिंदाल कंपनी कडून नवीन जेटीचे काम मिरवणे येथे सूरू असुन त्यांच्यामुळे स्थानिक मच्छिमारांमुळे नाहक त्रास दिले जात होते. त्याच्या विरोधात स्थानिकांनी एकत्र येत पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांच्याकडे तक्रार केली यावेळी मच्छिमारांनी पालकमंत्री यांच्या समोर जिंदाल कंपनीच्या समास्या बाबत जिंदालचे समन्वयक एस.एम.पाटील आणि इतर अधिकारी यांच्या समवेत चर्चा करुन तात्काळ २० लोकांची समिती स्थापन करण्याचे आदेश पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी दिले.
जिंदाल कंपनीच्या ज्या अडचणी आहेत त्या संदर्भात मच्छिमारासमोर चर्चा करुन कंपनीने ते पूर्ण करुन देण्याचे ठरवण्यात आले.चायनल मध्ये मच्छिमारी करण्यासाठी परवानगी देण्याचे आदेश पालकमंत्री यांनी दिले.जिंदाल कंपनीने जरा योग्य त्या परवाग्या घेतल्या नाहीत तर कारवाई करण्याचे आदेश ही देण्यात आले.यावेळी मच्छिमारांना विश्वासात घेवूच कंपनीने काम करणे गरजेचे असुन मच्छिमारांना डावललात तर उद्रेक होईल असा ईशारा ही पालकमंत्री यांनी दिला.
. यावेळेस मीटिंगला जिल्हाधिकारी देवेदर सिंह,पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी,अप्पर जिल्हाधिकारी श्री.बर्गे,निवासी जिल्हाधिकारी श्री.सूर्यवंशी,प्रांत जीवन देसाई,जिंदालचे अधिकारीएस,एम.पाटील,श्री.डगे,पी आर ओ मोरे,मच्छिमार मध्ये बशीर वडेकर,मुशतक टेमकर,सुदेश मोरे,बाबू पाटील,महेश नाटेकर,विष्णू पवार,नंदू केदारी,अजीम चिकटे,शरद चव्हाण,लतीफ सोलकर,प्रमोद घाडगे,विनोद चौघुले,गजानन हेदवकर,बाबय कल्याणकर,वरवडे सरपंच विराज पारकर,चैवंत आडाव्ह,नामदेव चौघुले बहुसंख्येनं मच्छिमार उपस्थित होते.
www.konkantoday.com