बाजारपेठेत हरवलेले महिलेची पर्स पोलिसांच्या सतर्कतेमुळे मिळाली परत.
ऐन दिवाळी सणात बाजारपेठेत पैसे व सोन्याचे दागिने असलेली पर्स हरवली. मात्र पोलिसांमुळे ती परत मिळाल्याने महिलेच्या चेहर्यावर हास्य फुलले. सध्या दिवाळी सण सुरू असल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली आहे. असे असताना बुधवारी संजया सुनील काटे यांनी १५ हजार रुपये सोन्याचे दागिने व काही कागदपत्रे असलेली पर्स हरवली होती. ही पर्स चिपळूण बाजारपेठ येथे गस्त घालणार्या महिला पोलीस हे. कॉ. आरती चव्हाण यांना सापडली. त्या ही पर्स घेवून पोलीस ठाण्यात आल्या. त्यानंतर काहीवेळाने काटे यांचा शोध घेण्यात आला. ही पर्स त्यांची असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांना ती परत करण्यात आली. त्यामुळे त्यांनी चव्हाण यांच्यासह उपस्थित पोलिसांना धन्यवाद दिले.www.konkantoday.com