निवडणूक आयोगाने अब्दुल सत्तार यांच्या शपथपत्राची चौकशी करण्याचे आदेश दिले.
शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांना मोठा झटका लागला आहे. निवडणूक आयोगाने थेट सत्तार यांच्या शपथपत्रांची तातडीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सत्तार यांचं टेन्शन वाढलं आहे.सत्तार यांची उमेदवारी राहणार की रद्द होणार? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या चौकशीत सत्तार दोषी आढळल्यास सिल्लोडच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.जिल्हा निवडणूक आयोगाने अब्दुल सत्तार यांच्या शपथपत्राची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे सत्तार यांची डोकेदुखी वाढली आहे. अब्दुल सत्तार यांच्या शपथपत्रात 16 चुकी असल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली