
खेडमध्ये मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला.
खेड शहरात मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. मोक्याच्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी येत असल्याने नागरिक कमालीचे धास्तावले आहेत. विशेषतः बच्चेकंपनीला जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आह. नगरप्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नसबंदीची मोहीम हाती घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.दीपावली सण सुरू असल्याने नागरिकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी वर्दळ वाढली आहे. मोकाट जनावरांपाठोपाठ मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरु असल्याने नागरिक कमालीचे धास्तावले आहेत. www.konkantoday.com