उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मारण्याची धमकी.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला अज्ञात क्रमांकावरुन मेसेज आला.योगी आदित्यनाथ यांनी दहा दिवसात राजीनामा दिला नाही, तर बाबा सिद्दीकी यांच्यासारखे मारु, असा उल्लेख मेसेजमध्ये करण्यात आलाय. महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुका सुरु आहेत. प्रचारासाठी योगी आदित्यनाथ देखील येण्याची शक्यता आहे, त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलिसांनी मेसेज गांभिर्याने घेतला असून चौकशी करण्यात येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला अज्ञात क्रमांकावरुन शनिवारी धमकीचा मेसेज आला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मारण्याची धमकी देण्यात आली. दहा दिवसांत राजीनामा दिला नाही, तर बाबा सिद्दीकी यांच्यासारखे गोळ्या झाडून मारु, असे मेसेजमध्ये म्हटले. धमकीचा मेसेज मिळाल्यानंतर पोलीस सतर्क झाले आहेत. मुंबई पोलिसांचे एक पथक या मेसेजचा तपास सुरु केलाय. मुंबई पोलिसांकडून धमकीचा मेसेज पाठवणाऱ्यांचा शोध घेतला जाणार आहे.