शिकारीसाठी बंदूक बाळगणार्या दोघांना अटक.
रत्नागिरी तालुक्यातील टिके कांबळेवाडी येथे शिकारीसाठी बंदूक बाळगणार्या दोघा संशयितांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. बुधवारी रात्री २ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. अनिश अरूण रेडीज (रा. हरचेरी-चांदेराई, रत्नागिरी) व संजय मधुकर महाजन (५५, रा. निरखुणेवाडी, चिंद्रवली) अशी संशयितांची नावे आहेत.संशयित आरोपी हे ३० ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास टिके कांबळेवाडी फाटा येथे संशयास्पद हालचाली करत असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यानुसार त्यांची झाडाझडती घेण्यात आली असता त्यांच्याकडे पोलिसांना एक सिंगल बॅरल बंदूक, ६ जीवंत काडतुसे, २ चार्जिंग बॅटरी, एक वॅगनर कार आदी आढळून आले. त्यांच्याविरूद्ध पोलिसांनी भारतीय हत्यार कायदा कलम ३ (१), २५ भारतीय न्याय संहिता कलम ३ (५) नुसार गुन्हा दाखल केला.www.konkantoday.com