
सोनारासह दोघे कोट्याधीश बँक खाती गोठवणार, बनावट दागिन्यांद्वारे सोनाराने कमावले कोट्यावधी रुपये
दिल्लीतून आणलेले नकली दागिने गहाण ठेवत कर्ज प्रकरण करून बँका, पतसंस्थांची फसवणूक करणार्या तीन संशयितांनी कोट्यावधीची माया गोळा केली आहे. कोल्हापूर येथील मुख्य सूत्रधार असलेल्या सोनाराकडे तर पाऊण कोटीच्या दरम्यान माया गोळा असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. त्यांच्या बँक खात्याची माहिती घेवूत ती तत्काळ गोठविण्यात येणार आहेत. पूर्णगड पोलिसांनी त्या अनुषंगाने कार्यवाही सुरू केली आहे.नकली दागिन्यांप्रकरणी पहिला गुन्हा मंगळवारी दि. २१ पूर्णगड पोलीस ठाण्यात दाखल झाला. अमेय सुधीर पाथरे (वय ४३, रा. खांबडवाडी, पावस), अमोल गणपती पोतदार (४७), प्रभात गजानन नार्वेकर (३२, दोन्ही रा. कोल्हापूर) या तिघांना पोलिसांनी अटक केली. www.konkantoday.com