फळपीक विमा योजनेसाठी बनावट क्षेत्र नोंदणी उघड.

हवामान आधारित फळपीक विमा योजनेमध्ये पावसाळी हंगामासाठी ७३ हजार ७७७ शेतकर्‍यांची विविध पिकांसाठी सहभाग नोंदवला होता. प्रत्यक्षात जागेवर फळबाग नसताना नोंदणी केली गेल्याच्या तक्रारी कृषी खात्याकडे आल्यानंतर नमुना पाहणी करण्यात आली तेव्हा ५९ टक्के अर्ज बनावट असल्याचे आढळले. आता राज्यात सगळीकडे फळपिक विमा योजना क्षेत्र पडताळणीचे आदेश जारी झाले आहेत.फळपीक विमा योजनेसाठी नावनोंदणी केलेल्या शेतकर्‍यांनी प्रत्यक्षातील फळबागेपेक्षा अधिक क्षेत्राची नोंदणी केली गेल्याच्या तक्रारी कृषी आयुक्तालयाला प्राप्त झाल्या. त्यामुळे आयुक्तालयाने १० तपासणी पथके तयार केली आणि ३६३ फळबागांची पडताळणी केली. या पडताळणीत ५९ टक्के अर्ज बनावट असल्याचे लक्षात आले. बनावट अर्जदारांना लगोलग या योजनेतून वगळण्यात आले. आयुक्तालयाच्या पथकाने ५ जिल्ह्यात ३६५ बागांना भेट दिली. त्यातील १४८ बागा विमायोग्य आढळल्या. १३६ ठिकाणी लागवडच आढळली नाही. ५५ ठिकाणी नमूद क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्राचा विमा उतरवला गेल्याचे आढळले. ५ ठिकाणी एकाच क्षेत्रावर एकापेक्षा अधिक व्यक्तींनी फळपीक विम्यासाठी नोंदणी केल्याचे लक्षात आले, अशी माहिती कृषी खात्याच्या नियोजन विभागाचे संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button