दापोली तालुक्यातील करजगावनदीत पडलेल्या तरुणाचा मृत्यू

दापोली :-शेताजवळील नदीत पाय घसरून पडलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना बुधवारी सकाळी दापोली तालुक्यातील करजगाव रामखरी नदी येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल अनंत धोपट (३५, रा. करजगाव, बिरबीवाडी, दापोली) असे त्यांचे नाव आहे. अनिल धोपट हे बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान करजगाव रामखरी नदी किनारी असणाऱ्या शेतात कामासाठी गेले होते. शेतात काम करत असताना ते शेताजवळ असणाऱ्या नदीवर गेले होते. त्यावेळी त्यांचा पाय घसरला आणि ते रेवश्याच्या डोहात पाण्यात पडले. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी दापोली पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button