आरोग्य मंदिर येथे रिक्षा व मोटरसायकलचा अपघात.
रत्नागिरी शहरातील आरोग्य मंदिर रस्त्यावर रिक्षेला दुचाकीने धडक देत अपघात केला. या अपघातात दुचाकी चालकासह रिक्षा चालक व प्रवासी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.फिर्यादी रिक्षा चालक लतीकेश कमलाकर भोरे हे आपल्या ताब्यातील रिक्षा ( एमएच -08-बीसी- 0494) घेऊन सोबत त्यांच्या शेजारी रहाणार्या लोकांना उपचारासाठी घेऊन येत असताना नाचणे-पॉवर हाऊस बसस्टॉप येथे आरोग्य मंदिरकडे वळत असताना मारुती मंदिरहून येणारी दुचाकी ( एमएच-08- एबी- 7705) वरील दुचाकी चालक आर्यन संतोष नागवेकर (20) याने रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षातील प्रवाश्यांसह दोन्ही चालक जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे