आता आदित्य ठाकरे यांनी अरविंद सावंत यांच्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला.
आता आदित्य ठाकरे यांनी अरविंद सावंत यांच्या या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. अरविंद सावंत कोणा एका व्यक्तीला बोलले नव्हते, ते सगळ्या 12 च्या 12 जणांना बोलले होते, तरी जर कुणाला वाईट वाटलं असेल तर आम्ही खेद व्यक्त करतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.अरविंद सावंत यांच्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त करताना आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना ज्यांनी पक्षात घेतलं, त्याच्यावर बोलणं गरजेचं आहे. बिल्कीस बानो यांच्या रेपिस्टची आरती ज्यांनी केली, ज्या वामन म्हात्रेने महिला पत्रकाराला विचारलं, अब्दुल सत्तारने सुप्रिया सुळेंना शिव्या दिल्या, ज्या संजय राठोड यांच्यावर गंभीर गुन्हा आहे, त्यावर बोलणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे.