रेल्‍वे तिकीट बुकिंगच्या नियमात आजपासून ‘हे’ बदल!

: रेल्‍वे तिकीट आगाऊ बुकिंगशी संबंधित नवे नियम आज १ नोव्हेबर २०२४ पासून लागू होत आहेत. त्‍यानुसार आता ६० दिवस आधी पर्यंत रेल्‍वेचे तिकीट बुकिंग करता येणार आहे. भारतीय रेल्‍वेने आगाऊ तिकीट बुकिंगच्या नियमात बदल केला आहे. आता फक्‍त ६० दिवस आधी म्‍हणजे (दोन महिने) आधी पर्यंत गाडीचे बुकिंग करता येणार आहे. आतापर्यंत १२० दिवस आधी पर्यंत बुकिंग करण्याची सुविधा मिळत होती. पण आता या दिवसांमध्ये कपात करून हि मुदत ६० दिवसांपर्यंत करण्यात आली आहे.*हे नवे नियम पहिल्‍यापासून बुक असलेल्‍या तिकीटांवर लागू नसतील. ज्‍या तिकीटांचे बुकिंग ३१ऑक्‍टोबर २०२४ पर्यंत १२० दिवसांच्या आगाऊ आरक्षण कालावधीत दिलेले आदेश वैध राहतील. नवीन आरक्षण कालावधीनुसार ६० दिवसांपेक्षा अधिक बुकिंगवर रद्दची सुविधा मिळेल. ताज एक्‍स्‍प्रेस आणि गोमती एक्‍स्‍प्रेस सारख्या काही दिवसांच्या वेळ असलेल्‍या एक्‍स्‍प्रेस रेल्‍वेंसाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ज्‍यामध्ये पहिल्‍यापासूनच कमी वेळेचा आरक्षण अवधी लागू आहे. परदेशी पर्यटकांसाठी ३६५ दिवसांच्या सीमेत कोणताही बदल करण्यात आलेले नाहीत.रेल्‍वे मंत्रालयाच्या म्‍हणण्यानुसार, नव्या नियमांआधी बुक करण्यात आलेल्‍या तिकीटांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. रेल्वे तिकीट बुकिंग IRCTC वेबसाईट, ॲप आणि रेल्वे बुकिंग काउंटरद्वारे केले जाते. जास्त प्रमाणात जागा रद्द करणे आणि जागा वाया जाणे यासारख्या प्रकारांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. रेल्‍वेच्या म्‍हणण्यानुसार, १२० दिवसांचा आगाउ रिजर्वेशन कालावधी हा खूप मोठा होतो. या कालावधीमध्ये केलेल्‍या जवळपास 21 टक्के तिकिटे रद्द केली जातात. तर जवळपास ४ ते ५ टक्‍के लोक प्रवास करत नाहीत. अनेक प्रकरणात अनेक प्रवाशांनी आपले तिकिट रद्दच केले नाहीत. ज्‍यामध्ये धोका करण्याची शक्‍यता ही अधिक असते. यामुळे गरजुंना वेळेत तिकीट उपलब्‍ध होत नाही. रेल्‍वेच्या मते फक्‍त १३ टक्‍के लोक चार महिने आधी रेल्‍वेचे तिकीट आगाऊ बुकींग करत होते. अधिकतर तिकीटांची बुकींग प्रवासाच्या ४५ दिवस आधीपर्यंत होत होती.रेल्‍वेच्या आगाऊ तिकीट बुकिंगच्या कालावधीत वेळेनुसार बदल होत आले आहेत. आतापर्यंतच्या नियमांनुसार, प्रवासाच्या आधी चार महिन्यांच्या आत रेल्‍वेचे आगाउ बुकिंग करता येत होते. रेल्‍वे मंत्रालयाने २५ मार्च २०१५ रोजी बुकिंगचा कालावधी ६० दिवसांपासून वाढवून १२० दिवस पर्यंत वाढवला हेता. त्‍यावेळी रेल्‍वेने तर्क केला होता की, तिकीट आगाउ बुकिंगचा कालावधी अधिक ठेवल्‍याने तिकिट दलाल बाजुला काढता येतील आणि तिकिट रद्दचे अधिक रक्‍कम घेता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button