
जाकादेवी येथे विंचू दंश झालेल्या अल्पवयीन मुलीचा उपचाराच्या दरम्याने मृत्यू.
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येथे विंचू दंश झालेल्या अल्पवयीन मुलीचा उपचारांदरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना गुरुवार 31 ऑक्टोबर रोजी पहाटे 5.40 वा. सुमारास घडली.सृष्टी महेश पानवलकर (12, रा. जाकादेवी,रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. शुक्रवार सायंकाळी 7.30 वा. सुमारास ती घरी असताना तिला विंचू चावला. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिला उपचारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र जाकादेवी येथे दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी तिला तपासून अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केेले. त्याठिकाणी तिच्या तब्बेतीत सुधारणा होत नसल्याने तिला 30 ऑक्टोबर रोजी खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्याठिकाणी उपचार सुरु असताना 31 ऑक्टोबर रोजी पहाटे 5.40 वा. सुमारास तिला वैद्यकिय अधिकार्यांनी तपासून मृत घोषित केले.