चिपळूण-संगमेश्‍वरमधून मनसेने अर्जच दाखल केला नाही.

चिपळूण-संगमेश्‍वरमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र अर्ज सादर करण्याच्या दिवशी अंतिम दिनीही अर्ज न भरल्याने मनसेने या निवडणुकीतून माघार घेतल्याचे स्पष्ट होत आहे. या माघारीमुळे तालुक्यात चर्चेला उधाण आले. मनसे कोणाला पाठिंबा देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.चिपळूण-संगमेश्‍वर मतदार संघाकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. महायुतीच्यावतीने शेखर निकम, आघाडीच्यावतीने प्रशांत यादव हे निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीत मनसेने उडी घेतली होती. तालुक्यात सार्वजनिक कार्यकर्ते श्रीपत शिंदे हे २९ रोजी अर्ज उमेदवारी अर्ज सादर करणार असल्याचे मनसे वर्तुळातून बोलले जात होते. मात्र अंतिम दिनीही शिंदे यांनी अर्ज सादर न केल्याने चर्चोला उधाण आले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button