
घडशीवाडीतील राखी संदीप घडशी बनली मेट्रोची चालक.
जिद्द व खुणगाठ मनाशी बांधून मेट्रोचालकपदी माभळे घडशीवाडीतील राखी संदीप घडशी रुजू झाली आहे. या यशाबद्दल तिचा संगमेश्वर पोलिस ठाण्यात गौरव करण्यात आला.दिवाळीसाठी राखी माभळे येथील गावी आली आहे. पैसा फंड संगमेश्वर येथे बारावीपर्यंत शिक्षण घेऊन सावर्डे येथे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हा दोन वर्षाचा कोर्स तिने केला. त्यानंतर ऑनलाइन भरतीसाठी अर्ज केला होता. त्यातून तिची निवड झाली. तीन महिन्याचे खास प्रशिक्षण होऊन मेट्रोचालकपदी ती रुजू झाली. ही बाब येथील महिलांसाठी व कुटुंबासाठी भूषणवह असल्याचे सांगून तिच्या पुढील वाटचालीस पोलिस निरीक्षक अमित यादव, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, पोलिस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, पोलिस अंमलदार आदींनी तिला शुभेच्छा दिल्या.