गुहागर भाजपमध्ये अखेर बंडखोरी, भाजपाचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांचा भाजप पक्षाचा राजीनामा.
गुहागरमध्ये भाजपमध्ये अखेर बंडखोरी झाली असून भाजपाचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी मंगळवारी भाजप पक्षाचा राजीनामा देत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीमधून उमेदवारी मिळालेला उमेदवार हा जिंकणारा पाहिजे होता, म्हणून आपण निवडणूक रिंगणात उतरल्याची प्रतिक्रिया अर्ज दाखल केल्यानंतर दिली.गुहागरमध्ये महायुतीमध्ये अजूनही एकत्रित बैठक झाली नाही. असे असताना शेवटच्या दिवशी भाजपाचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.www.konkantoday.com