
खेड शहरातील काही भागात अजूनही कमी दाबाची पाणी समस्या कायम.
खेड शहरातील काही भागात अजूनही कमी दाबाची पाणी समस्या कायम आहे. नागरिकांच्या मागणीनुसार याठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करून तहान भागवली जात आहे.शहरातील शिवतररोड, महाडनाका, कुवारसाई, कासारआळी, दापोलीनाका आदी ठिकाणी कमी दाबाची पाणी समस्या आजमितीसही कायम आहे. काही भागांमध्ये दिवसातून एकच वेळ पाणीपुरवठा वितरीत होत असल्याने नागरिकांची परवड होत आहे.बऱ्याचवेळा नागरिकांना टँकरच्या विकतच्या पाण्यावर तहान देखील भागवावी लागत आहे. नगरप्रशासनाकडे पाण्याचा एकच टँकर उपलब्ध आहे. यामुळे हा टँकर कुठे-कुठे फिरणार असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. कमी दाबाची पाणी समस्या सतावणाऱ्या भागात टँकरने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे.