
महामार्गावर अपघात झाल्यास कंत्राटदाराविरोधात गुन्हा नोंदविण्याचा राष्ट्रवादीचा निर्णय
राजापूर ः मुंबई-गोवा महामार्गावर अपघात झाल्यास कंत्राटदार व सरकारविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचा पवित्रा राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे सरचिटणीस अजित यशवंतराव यांनी घेतला आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे लांजा व राजापूर तालुक्यात सुरू असलेले काम हे निकृष्ठ दर्जाचे असल्याची सार्वत्रिक ओरड गेले अनेक महिने होत आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने महामार्गाच्या झालेल्या कामाचे ऑडीट झाले पाहिजे, अशी मागणी देखील यशवंतराव यांनी केली आहे.
निकृष्ठ दर्जाचे आणि पर्यावरणाला छेद देणार्या चौपदरीकरणाच्या कामामुळे नागरिकांचे जीव टांगणीला लागलेले आहेत.




