
कणकवली शहरातील बेकरी व कार्यालय आगीत भस्मसात.
कणकवली शहरातील अप्पासाहेब पटवर्धन या मुख्य चौकात असलेल्या आरबी बेकरीसह एक मेडिकल स्टोअर आणि एका खासगी ऑफिसला आग लागून मोठे नुकसान झाले. आज (शुक्रवार) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही आग लागलीशॉर्टसर्किटने आग लागली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. या आगीत आर बी बेकर्स यांचा दुकानातील संपूर्ण फर्निचर, बेकरी माल जळून खाक झाला. तर बेकरीच्या मागील राजू गवाणकर यांचे कार्यालय आणि कार्यालयालगत असलेल्या बर्डे यांच्या मेडिकल स्टोअरमधील साहित्याचे ही मोठे नुकसान झाले