ऐन दिवाळीत व्यावसायिक सिलिंडर ६२ रुपयांनी महाग, घरगुती सिलिंडरच्या दरांची स्थिती काय?

ऐन दिवाळीत देशभरात नागरिकांच्या खिशाला झळ बसणार आहे. कारण आजपासून म्हणजेच १ नोव्हेंबरपासून तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर आता महागले आहेत. सणासुदीच्या काळात व्यावसायिक सिलिंडर महाग झाला आहे. त्यामुळे आता या झळा सामान्यांनाच बसण्याची चिन्हं आहेत. तेल कंपन्यांनी लागू केलेल्या ताज्या दरांनुसार गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये ६२ रुपयांची वाढ झाली आहे. वावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झालेली असली तर तेल कंपन्यांनी १४ किलोंच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. तेल कंपन्यांनी आणखी एक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार भविष्यात विमानप्रवास महागण्याची शक्यता आहे. कारण तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरासोबतच विमानप्रवासात वापरल्या जाणाऱ्या ATF च्या किमतीतही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.*ऑक्टोबर महिन्यातही व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत वाढ*१ ऑक्टोबरला व्यावसायिक वापराचा सिलिंडर ४८ रुपयांनी महाग झाला होता. आता एक महिन्याने याच सिलिंडरची किंमत ६२ रुपयांनी महागली आहे. सुदैवाने घरगुती वापराच्या सिलिंडरमध्ये दरवाढ झालेली नाही.*व्यावसायिक गॅस सिलिंडरचा ताजा दर काय?*दिल्ली – १८०२ रुपयेकोलकाता – १९११ रुपयेमुंबई – १७५५ रुपयेचेन्नई – १९६५ रुपये*घरगुती गॅस सिलिंडरची नेमकी काय स्थिती?*व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तेल कंपन्यांनी वाढ केली असली तरी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. म्हणजेच १४ किलो गॅस सिलिंडरच्या दरात सध्यातरी कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. दिल्ली – ८०३ रुपये. कोलकाता – ८२९ रुपये. मुंबई – ८०३ रुपये चेन्नई – ८१९ रुपये. गेल्या चार महिन्यांत व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत १५० रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. दिल्लीत या काळात व्यावसायिक सिलिंडर १५६ रुपयांची वाढला तर मुंबईत सर्वाधिक वाढ झाली असून गेल्या चार महिन्यांत भावात १५६.५ रुपयांनी वाढ झाली. विशेष म्हणजे आजपासून व्यावसायिक LPG सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली असली तरी घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मात्र व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्याने रेस्तराँमधली जेवणाच्या किंमतीवर परिणाम होऊ शकतो आणि रेस्तराँ जेवणाचे दर वाढवू शकतात. ज्याचा फटका रेस्तराँमध्ये जेवायला जाणाऱ्या सामान्यांना बसणार यात काही शंकाच नाही*विमानप्रवास महागण्याची शक्यता*ऐन दिवळीच्या काळात विमानातून प्रवास करणाऱ्यांना चांगलाच फटका बसू शकतो. कारण तेल कंपन्यांनी विमानासाठी लागणाऱ्या इंधनाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १ नोव्हेंबरपासून विमानाचे इंधन म्हणजेच ATF च्या किमतीत तीन हजार रुपये प्रति किलो याप्रमाणे वाढ केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button