सावंतवाडी विधानसभेचे प्रतिस्पर्धी दिपक केसरकर व राजन तेली श्री देव विठ्ठल मंदिरमध्ये एकत्र!

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि पुर्वाश्रमीचे भाजपचे, सध्याचे महाविकास आघाडी ठाकरे शिवसेनेचे उमेदवार राजन तेली यांनी एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडले असतानाच दिपावली निमित्त एकत्रित श्री देव विठ्ठल मंदिर मध्ये आरती केली. संविधानाने दिलेल्या मताच्या अधिकाराचा वापर करून अनिष्ट प्रवृत्ती, नरकासुराला हरविण्याचे दोघांनीही दिपावली शुभेच्छा देताना आवाहन केले आहे.*सावंतवाडी येथील श्री देव विठ्ठल मंदिर मध्ये भल्या पहाटे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर आणि माजी आमदार राजन तेली यांनी हजेरी लावली. या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी मनोभावे प्रार्थना करत आरतीत सहभाग घेतला आणि शुभेच्छाही दिल्या. नरकासुर दहनानंतर दीपावली निमित्त सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे. सावंतवाडी येथील प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिर येथे पहाटे सावंतवाडीकर नतमस्तक झाले. विधानसभेचे प्रतिस्पर्धी उमेदवार देखील या निमित्ताने एकत्र दिसून आले.दीपावली निमित्त सावंतवाडीकर श्री विठ्ठल रखुमाई चरणी नतमस्तक झाले. पहाटेच्या काकड आरती प्रसंगी महायुतीचे उमेदवार मंत्री दीपक केसरकर व महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार राजन तेली एकत्र दिसून आले. दोघांकडून विठ्ठलाचे दर्शन घेत आराधना करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांना दीपक केसरकर व राजन तेलींकडून दिपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button