
संदेश पारकर या नावाची भीती नितेश राणेंनी घेतलेलीय -संदेश पारकर.
कणकवली विधानसभा मतदार संघातील दाखल उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली आहे.कणकवली विधानसभा मतदार संघात जवळपास 8 उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. पुढची प्रक्रिया 4 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आहे. जे अधिकृत उमेदवार शिल्लक राहतील त्यांच्यात लढत होईल. यादरम्यान महायुतीकडून मुस्लिम बांधवांमधून एक उमेदवार उभा केलेला आहे. नितेश राणे यांनी मतांची विभागणी व्हावी म्हणून म्हणून मुस्लिम बांधवांचा उमेदवार देण्यात आलेला आहे. असा आरोप संदेश पारकर यांनी केला आहे पारकर पुढे असंही म्हणाले की, माझ्या नावाला साम्य असणारे संदेश पारकर त्यांचासुद्धा उमेदवारी अर्ज वैध झालेला आहे. संदेश पारकर या नावाची भीती नितेश राणेंनी घेतलेली आहे, असा टोला ठाकरे-शिवसेनेचे संदेश पारकर यांनी लगावला.