
राज्यात कोरोनाबाधितांची रुग्णाची संख्या १२ हजार ९७४
राज्यात काल कोरोनाच्या नवीन ६७८ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या १२ हजार ९७४ झाली आहे आज दिवसभरात ११५ कोरोनाबाधित रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. आतापर्यंत राज्यभरात २११५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात एकूण १० हजार ३११ कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
www.konkantoday.com