
अणसुरे येथे शिकार करण्यासाठी दोघे संशयित ताब्यात.
राजापूर तालुक्यतील दांडे-अणसुरे पुलालगत जंगलमय भागात वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने फिरणार्या दोघांना बंदुकीसह नाटे पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. या कारवाईत पोलिसांनी सिंगल बॅरल बंदूक, दोन जीवंत काडतुसांसह सुमारे ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.नाटे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २७ ऑक्टोबरला सकाळी ६.१५ वाजता दर्शन दशरथ तांबे (२२) आणि प्रशांत सहदेव धरमकर (३६) हे दोघे दांडे अणसुरे पुलाच्या पुढे जंगलमय भागात शिकार करण्याच्या उद्देशाने सिंगल बॅरल बंदूक, दोन जीवंत काडतुसांसह आढळले. त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने पोलिसांनी त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. पोलिसांनी ५० हजार रुपयांची सिंगल लोखंडी बॅरल १२ बोअर बंदूक, दोन शक्तीमान एक्सप्रेस १ या कंपनीची जीवंत काडतुसे, मोबाईल, लोखंडी बॅटरी, हेडटॉर्च असे एकूण ६० हजार ३५० रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. www.konkantoday.com