
दारूच्या मोहापायी गमावले प्राण ,दारू समजून प्यायला विषारी औषध
दारू समजून रान मारण्याचे औषध प्राशन केलेल्या प्रौढ़ाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या बाबत पोलिसांकडून प्राप्त सविस्तर माहितीनुसार, विष्णू शांताराम लोटणकर (५१, रा. वाडीलिंबू वाघ्रट लांजा) यांनी दारू समजून रान मारण्याचे औषधाचे प्राशन केले. यामुळे त्यांची तब्येत खालावली. अधिकच्या उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालय येथे ७ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच दुपारी १.१० वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेची नोंद जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलीस चौकी मध्ये करण्यात आली आहे.
wwwkonkantoday.com