मुंबई-गोवा महामार्गावरील लवेलनजिक अपघात, दुचाकीस्वाराचा मृत्यू.
मुंबई-गोवा महामार्गावरील लवेलनजिक अथर्व पेट्रोलपंपासमोरील दुभाजकाजवळ वगॅनार कारला धडक देत झालेल्या अपघातात दुचाकीस्वार बाप्पा सहीबेन महनंत (४१) याचा मृत्यू झाला. या प्रकरणी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रोहित रघुनाथ कदम (३२) यांनी तक्रार दाखल केली आहे. ते वॅगनार कारने (एमएच-१७/सीआर-०६६९) चिपळूणच्या दिशेने जात होते. त्याचवेळी दुचाकीवरून (एमएच. ०३/एक्यू-१२०३) महनंत याने कारला समोरून धडक दिली. त्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी नजिकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. www.konkantoday.com