माझ्यावर अन्याय झाला असे आपण म्हणणार नाही-माजी आमदार सदानंद चव्हाण.

माझ्यावर अन्याय झाला असे आपण म्हणणार नाही. परंतु, या ठिकाणी शिवसेना प्रबळ असताना व त्यांचा मतदार असताना शिवसेनेला उमेदवारी मिळालेली नाही.एखाद्या शिवसैनिकाला उमेदवारी मिळाली असती. तर तो निवडून येऊ शकला नसता का? या पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना शिवसेना उपनेते, माजी आमदार सदानंद चव्हाण आपली खंत बोलून दाखवली आहे.महायुतीतर्फे आमदार शेखर निकम यांनी सोमवारी वसुबारसेच्या शुभ मुहूर्तावर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण हेदेखील उपस्थित होते.यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, महायुतीतर्फे आमदार शेखर निकम यांना उमेदवारी मिळाल्याबद्दल अभिनंदन करताना उमेदवारी अर्ज भरण्याआधी झालेली गर्दी पाहता आ. निकम यांचा विजय निश्चित आहे. या मतदारसंघात आपण दोन वेळा आमदार राहिलेलो आहे. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दोन वेळा प्रतिकूल परिस्थितीत संधी दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांना आपण चिपळूणमध्ये भगवा फडकवू, असा शब्द दिला होता. तो शब्द पूर्ण केल्याचे आपल्याला समाधान आहे.मात्र, आता या मतदारसंघातून शिवसेनेला उमेदवारी न मिळाल्याबाबत अधिक स्पष्टपणे बोलताना ते म्हणाले की, आपण गट- तट मानत नाही. इथे शिवसेनेची ताकद असतांनासुद्धा आजपर्यंतच्या विधानसभा निवडणुका पाहता प्रथमच चिपळूण- संगमेश्वरमध्ये शिवसेनेचा उमेदवार असणार नाही. सदानंद चव्हाण किंवा आ. शेखर निकम यांच्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली नसून ती परिस्थिती राज्यातील राजकीय रणनीतीमुळे उद्भवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button