सिंधुदुर्ग : खलाशामध्ये झालेल्या वादातून नौकेवरील तांडेलचा खून; नौका पेटवली!

देवगड : खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौकेवरील खलाशाने आपसात झालेल्या वादातून नौकेवरील तांडेलचा खून करून नौका पेटवल्याची घटना कुणकेश्वर पासून खोल समुद्रात १५ वाव अंतरात दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये बोटीचे सुमारे दीड कोटीचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. संशयित आरोपी जयप्रकाश विश्वकर्मा (रा. छत्तीसगड) हा नौकेवरून तांडेलाचा खून करून उडी मारून पलायन असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अधिक माहिती अशी, रत्नागिरी येथील राजीवडा भागातील नुमान रफिक फणसोपकर यांच्या मालकीची मुजत राबिया रविवारी (दि.२७) दुपारी १२ .३० च्या सुमारास मिरकर वाडा येथून मासेमारीसाठी निघाली होती. कुणकेश्वर येथे खोल समुद्रात मच्छीमारी करताना खलाशी व तांडेल यांच्यात वाद विकोपाला गेल्यानंतर खलाशी जयप्रकाश विश्वकर्मा यांनी तांडेल रवींद्र नाटेकर (रा. गुहागर) याचा खून करून नौका पेटवून दिलीनौकेने पेट घेतल्याचे नजीकच्या नौकांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. तसेच नौकेवरील खलाशांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि याबाबतची माहिती मत्स्य व्यवसाय अधिकारी पोलीस प्रशासन यांना देण्यात आली. त्यानुसार मत्स्य व्यवसाय अधिकारी पार्थ तावडे यांनी देवगड बंदर येथे येऊन सागर पोलीस दलास माहिती दिली. सागर पोलीस दलाच्या गस्तीनौकेने तात्काळ घटनास्थळी जाऊन त्या संशयित आरोपीला ताब्यात घेऊन देवगड बंदरात आणले. यावेळी देवगड बंदरातून म्हाळसा मल्हार या नौकेने घटनास्थळी जाऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. या नौकेतून स्थानिक मच्छीमार सागर सुरक्षा दलाचे कर्मचारी धाव घेऊन नौकेवरील आग विझवण्याचा प्रयत्न केला तसेच खलाशांना देवगड बंदरात मिनाक्षी नौकेवरून आणण्यात येत आहेघटनास्थळी देवगड पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सागर सुरक्षा दलाचे पोलीस उपनिरीक्षक गणपत दरवेस, पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक फकरुद्दीन आगा, पोलीस हवालदार आशिष कदम, पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील, स्वप्निल ठोंबरे, महिला पोलीस नाईक प्राची धोपटे, प्राजक्ता कविटकर, सर्वेश नाटेकर, निवासी नायब तहसीलदार विवेक शेठ, संजय गांधी नायक तहसीलदार सुरेंद्र कांबळे, मंडळ निरीक्षक पावसकर, प्रदीप कदम मत्स्य परवाना अधिकारी पार्थ तावडे यांनी देवगड बंदर जेटी येथे येऊन घटनेची माहिती घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button