विधानसभा सार्वत्रिक निवडणूक खर्च निरीक्षक, पोलीस निरीक्षकांसह 2 सर्वसाधारण निरीक्षक जिल्ह्यात दाखल
रत्नागिरी, दि. 28 : जिल्ह्यामध्ये सर्व विधानसभा मतदार संघासाठी पुरुषोत्तम कुमार हे खर्च निरीक्षक, राजेंद्र प्रसाद मीना हे पोलीस निरीक्षक तर, 263-दापोली, 264- गुहागर विधानसभा मतदार संघासाठी सुमित जरांगल हे सर्वसाधारण निरीक्षक आणि 265-चिपळूण, 266-रत्नागिरी, 267-राजापूर विधानसभा मतदार संघासाठी जनक प्रसाद पाठक हे सर्वसाधारण निरीक्षक म्हणून दाखल झाले आहेत. या निरीक्षकांना भेटण्यासाठी त्यांचे संपर्क क्रमांक आणि ठिकाण पुढीलप्रमाणे – पुरुषोत्तम कुमार (आयआरएस) – सर्व विधानसभा मतदार संघासाठी खर्च निरीक्षक – संपर्क क्रमांक 8149467650, ठिकाण – शासकीय विश्रामगृह, माळनाका, रत्नागिरी 263-दापोली, 264-गुहागर विधानसभा मतदार संघासाठी सर्वसाधारण निरीक्षक सुमित के जरांगल (आयएएस) – संपर्क क्रमांक 8149277989, ठिकाण – शासकीय विश्रामगृह, माळनाका, रत्नागिरी. 265-चिपळूण, 266-रत्नागिरी आणि 267-राजापूर विधानसभा मतदार संघासाठी सर्वसाधारण निरीक्षक जनक प्रसाद पाठक (आयएएस) संपर्क क्रमांक -7823012267, ठिकाण – शासकीय विश्रामगृह, माळनाका रत्नागिरी सर्व विधानसभा मतदार संघासाठी पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रसाद मीना (आयपीएस) संपर्क क्रमाक 9307962285, ठिकाण – शासकीय विश्रामगृह, माळनाका, रत्नागिरी