लोकजागृती फाउंडेशन रत्नागिरी चे वतीने मालगुंड येथे रक्तदान शिबीर संपन्न दि. 28/10/2024 जिल्हा रुग्णालय रत्नागिरी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड यांचे सहकार्य
प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड व जिल्हारुग्णालय रत्नागिरी यांचे सौजन्याने लोकजागृती फाउंडेशन रत्नागिरी यांचे वतीने मालगुंड येथील हॉटेल ओसियन ब्लु येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हॉटेल ओशियन ब्लु मधील कर्मचारी यांनी रक्तदान करणे साठी चांगला प्रतिसाद देऊन 25 नागरिकांनी रक्तदान केले. तसेच तीस वर्षा वरील 68 रुग्णांची NCD साठी आरोग्य तपासणी करण्यात आली. या मध्ये रक्तगट, वजन, उंची, बीपी, शुगर ची तपासणी करण्यात आली. या वेळी प्राथमिम आरोग्य केंद्र मालगुंड चे आरोग्य सहाय्यक व लोकजागृती फाउंडेशन चे कार्याध्यक्ष डॉ. परशुराम निवेंडकर, जिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रीतम सावंत, इन्चार्ज सिस्टर तन्वी रामपूरकर, रक्तपेढी तंत्रज्ञ् साबिया वस्ता, इरम काझी, आधीपरिचारिका कोमल पावसकर, जनसंपर्क अधिकारी श्रीम. प्रणाली आयरे, कर्मचारी कृष्णा माकवाना, वाहचालक श्री. संदीप वाडेकर तसेच आरोग्य केंद्र मालगुंड च्या cho श्रीम. मनाली तारवे, आरोग्य सेविका अश्विनी गोवळकर, आरोग्य सेवक विक्रम जाधव आशा सेविका समीक्षा मेणये उपस्थित होत्या.या शिबीरा साठी ओसियन ब्लु हॉटेल च्या मॅनेजर सोनाक्षी बुगडे यानी सर्व व्यवस्था उत्तम केली. हे शिबीर मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये,प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा जाधव व डॉ. सुनीता पवार यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.