
धोरणात्मक निर्णयातले गोंधळ सुधारल्याशिवाय लॉक डाउन घोषणा पोकळ आणि व्यर्थ:- दीपक पटवर्धन
कोरोना चा प्रसार वाढतो आहे त्याचे कारण धोरणात्मक निर्णयातील गोंधळ हे ही आहे. मात्र त्यात रत्नागिरीत सुधारणा होईल असं वाटत नाही. त्यामुळे लॉक डाउन घोषित करून कितपत नियंत्रण प्राप्त होईल या बद्द्ल शंका च आहे.अशी प्रतिक्रिया दीपक पटवर्धन भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी व्यक्त केली.
टेस्टिंग लॅब सुरू झाली पण अत्यल्प टेस्ट ची संख्या ठेवल्याने कोरोना प्रसार रोखणे आणि प्रतिबंधात्मक उपाय योजना यांचा वेग मंद आहे. बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांना संस्थात्मक विलगिकरणात ठेवणे बंधनकारक न करता त्यांना घरी शिक्का मारून पाठवणे ही सर्वात मोठी चूक आहे. त्यामुळे निर्बंध राहिले नाहीत. हॉस्पिटल ची सुविधा त्यातील त्रुटी या बाबत अनेक किस्से ऐकू येतात मात्र या वर प्रभावी उपाय योजना होताना दिसत नाही. ५५० च्या वर कोरोनाग्रस्तांची संख्या गेल्यावर परत लॉक डाउन त्याच्या होणाऱ्या मंत्री स्थरिय आणि प्रशासकीय स्थरावरील घोषणा हा गंमतीदार प्रकार दुर्देवाने अनुभवास येतोय.आपल्या जिल्ह्याला प्रभावी पालकमंत्री नसावा हे ही दुर्दैवी आहे. ग्रामपंचायतींना मजबूत करण्याचे राष्ट्रीय धोरण गुंडाळून ग्रामपंचायतींचे निधी परत मागणे ही शरमेची गोष्ट या राज्यात घडते आहे.
टेस्टिंग लॅब पूर्ण xhamtene सुरू झाली पाहिजे आरोग्य सुविधे मध्ये अधिक सुसूत्रता शिस्त आली पाहिजे. संस्थात्मक विलगिकरणा बाबत अधिक काटेकोर व्यवस्था या बाबत अधिक काम करणे आवश्यक आहे त्या वेळी लॉक डाउन उपयोगी होईल. लॉक डाउन राजकीय सोयीने वापरण्यात आले. कोरोना प्रसार रोकायचा असेल तर अधिक काटेकोर निर्बंध हवेत नुसतं लॉक डाउन घोषणा नि फार काही साध्य होणार नाही.जनतेने ही आता अधिक जागरूक राहत अधिक सुरक्षित कस राहता येईल यासाठी उपाययोजना आणि शिस्त अंगिकारली पाहिजे कारण आता राज्य सरकार कडून अपेक्षा ठेवण व्यर्थ आहे असे पटवर्धन म्हणाले.
www.konkantoday.com