
दुप्पट पैशाचे आम्हीच दाखवून राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्षाने केली महिलेची फसवणूक.
दुप्पट पैशाचे आमिष दाखवून राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षाने एका महिलेची तब्बल 13 लाख 19 हजाराची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत हा प्रकार घडला असून याप्रकरणी शनिवारी त्याच्यावर चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रईस महमुद अलवी (गोवळकोट) असे गुन्हा दाखल झालेल्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद रसिका रत्नाकार काजारी (43, खेंड) यांनी दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रईस अलवी याने रसिका काजारी यांना भाजी पाला-कांदा-इंपोर्ट एक्सपोर्टमध्ये व्यवसाय करण्यास सांगितला. तसेच त्यामध्ये 13 लाख 19 हजार रुपये पैसे गुंतवणूक करण्यास सांगितली. त्याचा दुप्पट फायदा मिळतो असे आमिष दाखवून काजारी यांच्याकडून वेळोवेळी पैसे गुंतवणूक करिता घेतले. यानंतर काजारी यांनी अलवी याच्याकडे त्यांनी गुंतवणूक केलेल्या पैशाची मागणी केली असता अलवी याने त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली.