
कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून शिंदे शिवसेनेकडून निलेश राणे यांनी देखील अर्ज भरला.
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ-२६९ मधून शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून निलेश राणे यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी मोठ्या उत्साहात दाखल करण्यात आला.यावेळी खासदार नारायण राणे, मंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, काका कुडाळकर आदी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. खासदार नारायण राणे यांसह उपस्थित नेतेमंडळी यांनी निलेश राणे यांना प्रचंड बहुमताने विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.उमेदवारी अर्ज दाखल केल्या नंतर निलेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, महायुतीचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. आमच्या सोबत जनता आहे. जनतेची सेवा करणे, प्रश्न सोडवणे याला प्राधान्य राहील.